महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२०) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) 'नकारात्मक मतदानाचा अधिकार' या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकलबाबत खलील विधाने पहा.

a) मतदानाचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून राज्यघटनेच्या कलम १९(१) अन्वये तो देण्यात आला आहे.
b) मतदाराला नकारात्मक मत व्यक्त करण्याची परवानगी न दिल्यास तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच कलम २१ ने दिलेल्या जीवनाच्या हक्काचा भंग होतो.
c) सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पी. सथशिवम, न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

वरील कोणती विधाने चूक आहेत?
  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

----------------------------------------------------------------------
२) अमेरिकेतील 'शट डाउन' या परिस्थितीबद्दल खलील विधाने पहा.

a) अर्थसंकल्पास अमेरिकी काँग्रेसची (प्रतिनिधिगृह आणि सिनेट ही दोन्ही सभागृहे) मंजुरी न मिळाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारच्या सेवांसाठी निधीच उपलब्ध होऊ शकत नाही.
b) अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांबाबत सत्ताधारी डेमॉक्रेटिक आणि विरोधी रिपब्लिकन पक्षामध्ये असलेले मतभेद दूर न झाल्यामुळे तेथील सरकारचा अर्थसंकल्प मंजूर होऊ शकला नाही.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) 'मनोधैर्य' योजने बद्दल खलील विधाने पहा.

a) बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख रुपये व विशेष प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त तीन लाख रुपये अर्थसहाय्य.
b) अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्याचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि इतर जखमांसाठी ५० हजार रुपये अर्थसहाय्य.
c) राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. a), b), c) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. b) आणि c) बरोबर

------------------------------------------------------------------------
४) मराठवाडा मुक्ति संग्रामचे प्रणेते म्हणून कोण ओळखले जातात?

  A. अरविंद घोष
  B. स्वामी रामानंद तीर्थ
  C. सरदार वल्लभभाई पटेल
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
५) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत उद्यानविद्या महाविद्यालयाची सुरुवात कोठे करण्यात आली आहे?

  A. रत्नागिरी
  B. सिंधुदुर्ग
  C. रायगड
  D. ठाणे

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने विचारात घ्या?

a) अपंगांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना दिले.
b) आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, हा नियम अपंगांसाठी आरक्षण देताना लागू होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) भारतीय वाणिज्य एंव उद्योग मंडल (एसोचेम) या संस्थेने भारताची अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी वाढेल असे जाहीर केले?

  A. 5.5
  B. 5.8
  C. 6
  D. 6.5

-------------------------------------------------------------------------
८) नुकत्याच राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या जेष्ठ नागरिक धोरणा नुसार ........... वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक या धोरणातील सुविधांसाठी पात्र धरले जाणार आहेत.

  A. 68
  B. 60
  C. 72
  D. 65

-------------------------------------------------------------------------
९) अरुंधति भट्टाचार्य हे नाव खालीलपैकी कोणत्या बँक समुहाशी संबंधित आहे?

  A. ICICI
  B. SBI
  C. Standard Chartered
  D. HDFC

-------------------------------------------------------------------------
१०) खालीलपैकी CAG च्या सल्लागार समितीवर नुकतीच कोणाची निवड झाली?

  A. डॉ अभय बंग
  B. डॉ नरेंद्र जाधव
  C. माधव गाङगीळ
  D. असीम सरोदे

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.