महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२१) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) नोबेल पुरस्कारासंबंधी खलील विधाने पहा.

a) हिग्ज बोसॉन शक्यता वर्तवणारा सिद्धांत मांडणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज व बेल्जियमचे फ्रँकाइस एंगलर्ट यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक सैद्धांतिक संशोधनासाठी जाहीर करण्यात आले आहे.
b) नोबेल पारितोषिक मरणोत्तर देता येत नाही असा नियम आहे.
c) स्टॉकहोम येथे ११ डिसेंबरला आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

कोणती विधाने चूक नाहीत?
  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) एम एस स्वामिनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात.
b) नुकताच त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) 'मोहन धारिया' यांबद्दल खालील विधाने पहा.

a) मोहन धारिया यांनी 'वनराई' या पर्यावरणवादी संस्थेची स्थापना केली.
b) १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
c) 2005 मध्ये त्यांना 'पद्म भूषण' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व

------------------------------------------------------------------------
४) शांततेच्या नोबेल पुरस्कारासंबंधी खालील विधाने पहा.

a) संयुक्त राष्ट्रांच्या रासायनिक अस्त्रे प्रतिबंधक संस्थेला (ओपीसीडब्ल्यू) यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
b) 'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स' (ओपीसीडब्ल्यू) या संस्थेची स्थापना हेग येथे २००५ मध्ये रासायनिक अस्त्रे नष्ट करण्याच्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी केली होती.
c) शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीमध्ये 'व्लादिमीर पुतिन' यांचाही समावेश होता.

वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
  A. a) आणि b)
  B. a) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

-------------------------------------------------------------------------
५) खालील दोन विधाने पहा.

a) भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच्या ओडीसा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना 'फायलीन' या चक्रीवादळाने तडाखा दिला.
b) फायलीन हे नाव बांगलादेशाने दिले आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
६) राज्यातील पहिले इस्लामीक संस्कृतिक केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी राज्य शासन 25 कोटी रुपयांचा निधि देणार आहे?

  A. कन्नाड (औरंगाबाद )
  B. मुंब्रा (ठाणे)
  C. पुणे
  D. नाशिक सिटि

-------------------------------------------------------------------------
७) राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ आणि जपानच्या कोणत्या राज्याच्या गवर्नर यांनी पर्यटन विस्तार तसाच कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चलना देणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या?

  A. हिरोशिमा
  B. वाकायामा
  C. क्योतो
  D. टोक्यो

-------------------------------------------------------------------------
८) राज्यात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यासाठी कोणत्या अभिनेत्याची 'सदिच्छा दूत' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  A. आमिर खान
  B. सिद्धार्थ जाधव
  C. अमिताभ बच्चन
  D. अतुल कुलकर्णी

-------------------------------------------------------------------------
९) 2013 सालचे साहित्याचे नोबेल पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली?

  A. Hilary Mantel
  B. Lydia Davis
  C. Alice Munro
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
१०) ज्वाला गट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  A. टेनिस
  B. क्रिकेट
  C. हॉकी
  D. बॅडमिंटन

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.