महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(23) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) सी. डी. देशमुख यांच्यासंबंधी खालील विधाने पहा.

a) रिझव्र्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर.
b) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
c) त्यांना रोमन मॅगसेसे पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

वरील कोणती विधाने चूक आहेत?
  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) ९४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन पंढरपूर येथे होणार आहे.
b) संमेलनाध्यक्ष म्हणून अरुण काकडे यांची निवड झाली आहे.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) ऑक्टोबर २०१३ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सीमा संरक्षण सहकार्य करार (BDCA) केला?

  A. पाकीस्थान
  B. म्यानमार
  C. अफगाणिस्थान
  D. चीन

------------------------------------------------------------------------
४) भाक्रा नांगल धरणाबद्दल कोणती विधाने सत्य आहेत.

a) 'उगवत्या भारताचे तीर्थक्षेत्र' असे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून संबोधण्यात आले.
b) स्वतंत्र भारतात बांधण्यात आलेले हे पहिलेच धरण.
c) सतलज नदीवर बांधण्यात आले.
d) धरणाच्या जलाशयाला शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या नावाने ओळखले जाते.(गोविंद सागर)

  A. b), c) आणि d)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. वरील सर्व

-------------------------------------------------------------------------
५) खालील विधाने विचारात घ्या:

a) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या 'Global Gender Gap Report २०१३' मध्ये १३६ देशांच्या यादीत भारताचे १०१ वे स्थान मिळाले आहे.
b) २०१२ मध्ये भारताला १०५ वे स्थान मिळाले होते.
c) राजकीय सशक्तीकरण ९ वे स्थान, शैक्षणिक यशप्राप्ती 120 वे स्थान ,आर्थिक सहभाग आणि संधी मध्ये १२४ वे स्थान, आरोग्य मध्ये १३५ वे स्थान.

वरील कोणती विधाने सत्य आहेत.

  A. a), b) आणि c)
  B. b), c) आणि d)
  C. a), c) आणि d)
  D. वरील सर्व

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने विचारात घ्या.

a) 'जागतिक क्षय रोग अहवाल २०१३' नुसार जागतिक TB च्या रुग्णांच्या २६% रुग्ण भारतामध्ये आहेत.
b) क्षयरोग संबंधी प्रादुर्भाव, फैलाव व मृत्यू दर कमी करणे हे UN च्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये समाविष्ठ आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) हरियाणातील भिवाणीमध्ये झालेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत ...........याने 'हिंदकेसरी' किताब पटकावला?

  A. योगेश दोडके
  B. सानिकुमार
  C. अमोल बराटे
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
८)'सुकन्या योजने' संबंधी खालील विधाने पहा.

a) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पहिल्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी 21,200 रुपये इतकी रक्कम शासन 18 वर्षांसाठी जीवन वीमा योजनेत गुंतविणार आहे. या गुंतवणुकीतून प्रत्येक मुलीला एक लाख रुपये मिळणार आहेत.
b) या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे १२ वी पर्यंतचे शिक्षण तसाच १८ वयापर्यंत लग्न न होणे गरजेचे आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
९) सिंगापूर एअरलाईन्सने भारतामधील कोणत्या कंपनीसोबत भागेदारी करून भारतीय हवाई क्षेत्रात पदार्पण केले?

  A. बिर्ला
  B. मित्तल
  C. टाटा
  D. रिलायंस

-------------------------------------------------------------------------
१०) दक्षिण कोरिया साठी 'सदिच्छा दूत' म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

  A. सलमान खान
  B. अजय देवगण
  C. शाहरुख खान
  D. अमीर खान

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.