महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२७) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसंबंधी खालील विधाने पहा.

a) या योजनेद्वारे विमा कंपनीच्या सहाय्याने निवडक गंभीर आजारावर 972 उपचार पध्दतीनुसार योजनेसाठी निवडलेल्या रुग्णालयातून प्रत्येक कुटूंबासाठी 1.50 लाख रुपये मर्यादेपर्यंत मोफत उपचार व 121 पाठपुरावा उपचार करण्यात येतात.
b) 1 लाख किंवा कमी उत्पन्न असणा-या कुटूंबासाठी ( पिवळे, केशरी शिधापत्रिका व अन्नपूर्णा आणि अंत्योदय कार्ड धारकांसाठी ) ही योजना सुरु करण्यात आली.
c) राज्यात 2 जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्वावर सोलापूरसह रायगड, धुळे, नांदेड, अमरावती, गडचिरोली, मुंबई शहर व मुंबई उपनगरे या 8 जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात आला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरनाणे 'नागझिरा' अभयारन्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून विकसित करण्यास नुकतीच मान्यता दिली.
b) महाराष्ट्रामध्ये याआधी मेळघाट, ताडोबा, पेंच आणि सह्याद्री हे व्याघ्र प्रकल्प आहेत.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) दक्षिण आशिया क्षेत्रात आरोग्याबाबत प्रसार करण्यासाठी .......... यांना युनिसेफचा 'स्वच्छता दूत' म्हणून नियुक्त केले आहे.

  A. सचिन तेंडुलकर
  B. आमिर खान
  C. काजोल
  D. विद्या बालन

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना, संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली.
b) या परिषदेमार्फत दिला जाणारा 'महात्मा फुले समता पुरस्कार' २०१३ जेष्ठ पत्रकार 'कुमार केतकर' यांना प्रदान करण्यात आला.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये झाला असण्याचा अंदाज व्यक्त करणारे पुरावे पुरातत्त्व तज्ज्ञांना मिळाले आहेत.
b) गौतम बुद्धांचे जन्मस्थान असणाऱ्या नेपाळच्या 'लुम्बिनी' येथील एका स्थळाच्या अभ्यासावरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला.
c) बुद्धांचा जन्मकाळ इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये असल्याचे आतापर्यंत सांगण्यात येते.
d) 'युनेस्को'ने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या 'लुम्बिनी' येथील मायादेवी मंदिरामध्ये उत्खनन करण्यात आले.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) खालील विधाने विचारात घ्या.

a) चीनने पूर्व चीन समुद्रावरील आकाशाला 'एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन' जाहीर केले आहे.
b) सेनकाकू बेटांच्या मालकीवरून चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्ये वाद आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
७) खलील विधाने विचारात घ्या:

a) इंग्लंड, उत्तर आर्यलड, वेल्स आणि स्कॉटलंड यांना आजवर एकत्रितपणे 'युनायटेड किंगडम' म्हणून ओळखले जात होते.
b) मात्र, स्कॉटलंडने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ मध्ये याच दृष्टीने सार्वमत घेण्यात येणार आहे.

  A. a) बरोबर
  B. b) बरोबर
  C. दोन्ही चूक
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) पुढील विधांनांचा विचार करा.

a) पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल राहील शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
b) पाकिस्तानचे लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी नोव्हेंबर अखेरीस निवृत्त होणार आहेत.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
९) खालील कोणती विधाने असत्या आहेत?
a) इराणचा वादग्रस्त अणुकार्यक्रम सहा महिन्यांसाठी थांबविण्याचा ऐतिहासिक निर्णय जीनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत रविवारी घेण्यात आला.
b) इराण आणि अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, फ्रान्स व जर्मनी या 'पी ५+१' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाच्या प्रतिनिधींमध्ये या वाटाघाटी सुरू होत्या.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि b)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------
१०) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) पाच वेळेचा विश्वविजेता भारताचा सुपर ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंद याला मात देत नॉर्वेचा वर्ल्ड नंबर १ मॅग्नस कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्व चॅम्पियन बनला.
b) आनंदने पहिल्यांदा २००० मध्ये विश्वविजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याने २००७, २००८, २०१०, २०१२ मध्ये विश्वविजेता होण्याचा मान मिळविला.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.