महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२८) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ' च्या परिषदेसंबंधी खालील विधाने पहा.

a)इंडोनेशियातील बाली येथे ' जी-३३ ' या ' वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ' च्या ४६ सदस्य देशांच्या व्यापार मंत्र्यांची नववी परिषद पार पडली
b) जीनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या ' वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ' ने (डब्ल्यूटीओ) देशांनी अन्नधान्यावर सबसिडी देताना त्यांच्या एकूण शेती उत्पादनाच्या दहा टक्के इतकी द्यावी अशी मर्यादा ' अॅग्रीमेंट ऑन अॅग्रीकल्चर ' नुसार घातली आहे.
c) अन्नधान्यावरील सबसिडीच्या मुद्द्यावर विकसित देशांनी ' पीस क्लॉज ' चा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार सबसिडीच्या मर्यादेचे उल्लंघन झाले , तरी चार वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित देशांवर कारवाई होणार नाही.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) 'बायो-ऑक्सिजन-डिझॉल्व्हड' (बीओडी) म्हणजे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण. ते प्रति लिटर मि.लि.ग्रॅममध्ये मोजतात. 'बीओडी' हा पाण्याची गुणवत्ता मोजण्याचा महत्त्वाचा निकष आहे.
b) भारतातील १५० नद्या प्रदूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला. त्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) ड्रोन हे मानवरहित विमान आता ......... अमेरिकेतील कंपनीच्या कुरिअर सेवेसाठी वापरले जाणार आहे.

  A. FedEx
  B. Amazon
  C. DHL
  D. UPS

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) जगभरातील काळ्या पैशांच्या व्यवहारावर नजर ठेवणाऱ्या ' ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी ' ( जीएफआय) या संस्थेच्या म्हणण्यानुसार भारतातून २०११ मध्ये तब्बल ४ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशाबाहेर गेला आहे. ही रक्कम २०१०पेक्षा २४ टक्क्यांनी जास्त आहे.
b) b) हा काळा पैसा, फक्त एका वर्षातील २०१०-११ च्या बजेटच्या (१३ लाख कोटी) एक तृतीयांश रक्कम, केंद्रीय आरोग्य क्षेत्रातील खर्चाच्या चौदापट रक्कम, शैक्षणिक खर्चाच्या सात पट, ग्रामविकास योजनांच्या पाचपट रक्कम इतकी मोठी आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) जम्मू-काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा संबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) जम्मू-काश्मीरला कलम ३७० नुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे.
b) भारतीय दंडविधानातील सर्व कायदे राज्यातील नागरिकांना लागू करण्यासाठी राज्य सरकारच्या विशेष परवानगीची आवश्यकता आहे.
c) नागरिकत्व , मालमत्तेची मालकी आणि मूलभूत हक्कांविषयी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना विशेष दर्जा असेल.
d) काश्मीरमध्ये कोणत्या स्वरूपाचे कायदे-कानून वापरायचे याचा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारला असून, त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याचे सर्वाधिकारही राज्य सरकारला आहेत.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) खालील विधाने विचारात घ्या.

a) भारत व चीन दरम्यान असलेल्या सीमारेषेला मैकमोहण रेषा असे म्हणतात.
b) 'अरुणाचल' हा भारताने बळकावलेला प्रदेश असल्याचे चीनने नुकतेच म्हटले आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
७) खलील विधाने विचारात घ्या:

a) यापुढे केवळ घटनात्मक पद असलेल्या उच्च पदस्थांनाच कामासाठी जात असतानाच लाल दिव्याचा वापर करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच सायरनच्या वापराला मज्जाव केला आहे.
b) अॅम्ब्युलन्स, अग्नीशमन दल, पोलिस यासारख्या तातडीच्या सेवांसाठी लालऐवजी निळा, पांढरा किंवा मल्टीकलर दिवा वापरता येईल, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

  A. a) बरोबर
  B. b) बरोबर
  C. दोन्ही चूक
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८)भारतीय दंडविधानाच्या कलम ......... नुसार अनैसर्गिक शरीरसंबंध हा दंडनीय अपराध आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

  A. ३७०
  B. ३७७
  C. ३४५
  D. ३७१

-------------------------------------------------------------------------
९) खालील कोणती विधाने असत्या आहेत?
a) वर्णद्वेषाच्या प्रवृत्तीविरोधात बंडाचा एल्गार करत समतेसाठी संघर्ष करणारे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष, डॉ. नेल्सन मंडेला (९५) यांचे नुकतेच निधन झाले.
b) १९९० साली त्यांना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्य नागरी पुरस्कार देण्यात आला.
c) १९९३ साली त्यांना नोबेल शांतता पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि c)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------
१०) शौर्य आणि निष्ठा याच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिखांचा कोणत्या देशाने सैन्यात समावेश नुकताच नाकारण्यात आला?

  A. पाकीस्थान
  B. इंग्लंड
  C. जर्मनी
  D. अमेरिका

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.