महत्वाच्या पोस्ट

MPSC फेब्रुवारी प्रश्नमंजुषा(३६) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs February 2014

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) खालील विधाने पहा.

a) ११ व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ९ टक्के विकासदराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
b) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये (२००७ ते २०१२) सरासरी आठ टक्के आर्थिक वाढीचा दर गाठण्यात सरकारला यश आले आहे, अशी माहिती राज्यसभेमध्ये देण्यात आली.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) जगातील २० बडय़ा देशांनी जागतिक आर्थिक वाढ २ टक्क्य़ांनी म्हणजे २ ट्रिलियन अमेरिकी डॉलरनी येत्या पाच वर्षांत वाढवण्याचा निर्धार केला आहे.
b) स्वयंचलित कर माहिती विनिमय यंत्रणा २०१५ मध्ये अमलात येईल.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) जागतिक कीर्तीचे विश्वरचना वैज्ञानिक प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना २०१३ चा डॉ. येलवर्थी नायुदम्मा स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
b) डॉ. नायुदम्मा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार खगोलशास्त्रातील कामगिरीसाठी दिला जातो.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) सोविएत रशियाच्या विघटनानंतर सर्वात मोठा हिंसाचार युक्रेनमध्ये पोलीस व निदर्शक यांच्या धुमश्चक्रीत झाला असून त्याने अनेक लोक मारले गेले आहेत.
b) हिंसाचार, मानवी हक्क उल्लंघन, बळाचा जादा वापर या कारनास्थाव युरोपीय समुदायाने युक्रेनवर प्रवास व संपत्ती गोठवण्याचे र्निबध जारी केले.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) जगभरातील स्मार्ट फोन ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले 'व्हॉटस् अॅप'ला सोशल नेटवर्किंगमधील जाएंट असलेल्या 'फेसबुक'ने तब्बल १९ अब्ज डॉलर देऊन विकत घेतले.
b) व्हॉट्सअॅपचे संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी जेन कोम हे आहेत.

  A. a)
  B. b)
  C. a) आणी b)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने पहा.

a) इटलीच्या पंतप्रधानपदाची सूत्रे मात्तेओ रेन्सी यांनी स्वीकारली.
b) रेन्सी (वय ३९) इटलीचे सर्वांत तरुण पंतप्रधान असून, त्यांनी एनरिको लेट्टा यांचा पराभव केला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) उडिया भाषेला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या भाषेलाही लवकरच अभिजात दर्जा प्राप्त होईल.
b) आता उडिया भाषाही संस्कृत, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांच्या बरोबरीने अभिजात भाषा म्हणून गणली जाईल.
c) एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास त्या भाषेच्या अभ्यासासाठी 'अभिजात भाषा अभ्यास केंद्र' स्थापन करता येते.
d) संबंधित भाषेच्या अभ्यासासाठी अध्यासने स्थापन करण्याची विनंती विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) करता येते.

  A. a), b) आणी c) बरोबर
  B. a) आणी d) बरोबर
  C. वरील सर्व बरोबर
  D. a) आणी c) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) मुस्लिम कुटुंबीयांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
b) 'मुस्लिम पर्सनल लॉ'नुसार मुस्लिमांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
c) 'देशातील नागरिकाला कायद्याप्रमाणे मुलांना दत्तक घेण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही 'पर्सनल लॉ'मुळे हा अधिकार काढून घेता येणार नाही. प्रत्येक नागरिकाला मूल दत्तक घेण्याला कायद्याचे अधिष्ठान आहे, मात्र, मूल दत्तक घेण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, असे म्हणता येणार नाही.'असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
d) घटनेतील ४४व्या कलमानुसार सर्वांना समान नागरी कायदा अपेक्षित आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. a), b) आणी c) बरोबर
  C. a) आणी d) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a)देशातून सुमारे सात दशकांपूर्वीच नामशेष झालेल्या चित्त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) २६० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे.
b) मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामधील नौरादेही अभयारण्यामध्ये हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे.
c) या पूर्वी, चित्त्याच्या पुनरुज्जीवनासाठी शेओपूर जिल्ह्यामध्ये ३४४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या पालपूर-कुनो अभयारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; परंतु दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने आशियाई सिंहांचे संवर्धन पालपूर अभयारण्यात करण्याची सूचना केल्याने चित्त्यासाठी दुसऱ्या अभयारण्याचा शोध घेणे सुरू होते.

  A. फक्त a) बरोबर
  B. a), b) आणी c) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्य आहेत?

a) भारताला एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) चांगली सुधारणा हवी असल्यास पुरवठा सुधारण्याबरोबर महागाई व्यवस्थापनाच्या धोरणात आणखी सुधारणा होण्याची गरज आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) स्पष्ट केले.
b) तसेच २०१४-१५ मध्ये भारताचा अर्थव्यवस्था वाढीचा दर ५.४ राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि b)
  D. एकही असत्य नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.