महत्वाच्या पोस्ट

मार्च प्रश्नमंजुषा(३८) चालू घडामोडी

MPSC Current affairs March 2014                                             

                          



१) नॅशनल बॉम्ब डेटा सेंटरच्या (एनबीडीसी) आकडेवारी संबंधी खालील विधाने पहा.

a) बॉम्बस्फोट आणि त्यात मृत्युमुखी पडणा-यांची संख्या, याचा विचार करता भारत हा जगातील तिसरा धोकादायक देश असल्याचं स्पष्ट होतं. या यादीत इराक आणि पाकिस्तान हे भारताच्या वर आहेत.
b) जगातील एकूण बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, भारत आणि इराक या तीन देशांमध्येच होत असल्याचं एनबीडीसीच्या आकडेवारीतून दिसतं.
c) २०१३ मध्ये भारतात २१२ बॉम्बस्फोट झाले. २०१२मधील २४१ स्फोटांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी मृतांची संख्या मात्र गेल्या वर्षी अधिक होती. या बॉम्बस्फोटांमध्ये १३० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते आणि ४६६ जण जखमी झाले होते.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) ऑस्करसंबंधी खलील दोन विधाने पहा.

a) अमेरिकेच्या इतिहासातील गुलामगिरीचा सर्वात काळाकुट्ट कालखंड दाखवणारा '१२ इयर्स अ स्लेव्ह' ८६व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
b) दिग्दर्शक स्टीव्ह मॅक्वीनच्या रूपाने कृष्णवर्णीय दिग्दर्शकाच्या चित्रपटाला ऑस्करच्या इतिहासात प्रथमच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) सामाजिक बांधीलकी(सीएसआर) संबंधी खालील विधाने पहा.

a) कंपन्यांनी त्यांच्या गेल्या तीन वर्षांतील नफ्याच्या सरासरी प्रमाणात किमान दोन टक्के रक्कम सीएसआरवर(Corporate social responsibility) खर्च करण्याचे बंधन आहे.
b) पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वा किमान एक हजार कोटी रुपयांची उलाढाल वा किमना निव्वळ नफा पाच कोटी रुपये असणाऱ्या कंपन्यांना सीएसआरवर खर्च करणे बंधनकारक आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडला (केबीएल) त्यांच्या कोईंबतूर येथील प्रकल्पाकरिता मॉरीशसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आफ्रिका-इंडिया लीडरशिप अवॉर्डमध्ये 'बेस्ट ऑर्गनायझेशन फॉर विमेन टॅलेण्ट डेव्हलपमेण्ट' या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.
b) निर्माण प्रक्रियांमध्ये १०० टक्के स्त्री सहाय्यकांचा समावेश केला गेलेली केबीएल ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) 'इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट २०१४' (ईआययू)ने जगभरातील राहणीमानावर होणाऱ्या खर्चाचा आढाच घेतला.
b) यामध्ये सिंगापूर हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे आढळून आले. तर त्यानंतर पॅरिस, ओस्लो, झुरिच आणि सिडनी या शहरांचा क्रमांक लागतो.
c) जगभरातील वेगवेगळ्या शहरांचा विचार करता राहण्यासाठी मुंबई हे सर्वात स्वस्त, तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकाचे स्वस्त शहर असल्याचे दिसले.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त d)

MPSC फेब्रुवारी प्रश्नमंजुषा(३६) चालू घडामोडी

६) खलील विधाने पहा.

a) अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेल्या लक्ष्मी हिचा अमेरिकेच्या प्रथम नागरिक मिशेल ओबामा यांनी आंतरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार देऊन गौरव केला.
b) लक्ष्मीने भारतातील अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व मुलींची चळवळ सुरू केली आहे.
c) गेल्या वर्षी डिसेंबर २०१२ मध्ये सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या मुलीला मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला होता.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
७) ऑस्करसंबंधी खालील विधाने पहा.

a) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर 'डल्लास बायर्स क्लब'मधील भूमिकेसाठी मॅथ्यू मॅकॉन्वेला मिळाले.
b) केट ब्लँचेट हिला 'ब्ल्यू जास्मिन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
c) यंदाचा 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' पुरस्कार इटलीच्या 'द ग्रेट ब्युटी'ला देण्यात आला आहे.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) 'पेड न्यूज'वरील नियंत्रणासाठी 'मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी' या विशेष समितीची घोषणा निवडणूक आयोगाने केली.
b) वृत्तांकनाच्या माध्यमातून 'राजकीय जाहिरातबाजी' तर होत नाही ना याकडे ही समिती लक्ष ठेवेल.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) चूक
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) जागतिक धनाढय़ांच्या फोर्ब्स सूचीत स्थान मिळविणाऱ्या ५६ अब्जाधीश भारतीयांमध्ये सलग सातव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
b)जागतिक क्रमवारीतील अग्रणी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे पुन्हा एकदा भूमंडळावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

  A. फक्त a) बरोबर
  B. a) आणी b) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) साहित्यातील कामगिरीसाठी 'येल' विद्यापीठाच्या वतीने दिल्या जाणारा 'विंडहॅम कॅम्पबेल' साहित्य पुरस्कार कादंबरी सोडून इतर साहित्य प्रकारात भारतीय लेखक पंकज मिश्रा यांना जाहीर झाला आहे.
b) येल विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार एकूण आठ लेखकांना दिला जातो.
c) मिश्रा यांच्या 'रोमॅंटिक्स' या कादंबरीशिवाय 'फ्रॉम द रूइन्स ऑफ एम्पायर- द इंटलेक्च्युअल हू रिमेड आशिया' ही इतर पुस्तके लिहिली आहेत.
d) २०१४ मध्ये 'कादंबरी' गटात अमिनता फोरना (सिएरा लिओन), नदीम अस्लम (पाकिस्तान), जिम ग्रेस ( इंग्लंड), कादंबरी वगळून इतर प्रकारात पंकज मिश्रा (भारत), जॉन व्हॅलन्ट (अमेरिका/कॅनडा), नाटक गटात किया कॉरथ्रॉन (अमेरिका), सॅम होलक्रॉफ्ट (इंग्लंड), नोएली जॅनकझेवास्का ( ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे.

  A. a),C),d)
  B. b),c),d)
  C. b) आणि d)
  D. एकही असत्य नाही


अणुविज्ञान- प्रश्नमंजुषा (३७)


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.