महत्वाच्या पोस्ट

Current Affairs- प्रश्नमंजुषा(४३)

MPSC Current Affairs

Mpsc Current Affairs March 2014- Multiple Choice Questions                                             

                          



१) खालील विधाने पहा.

a) युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियाचा प्रदेशाचा ताबा घेतल्याबद्दल रशियाला जी-८ देशांच्या गटातून निलंबित करण्यात आले आहे.
b) जी-७ गटांच्या नेदरलँड्समधील हेग येथे सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
c) जी-८ देशांची रशियात होणारी शिखर बैठक रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून आता ही परिषद ब्रसेल्स येथे जी-७ गटाच्या स्वरूपात होणार आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) पृथ्वी-2 संबंधी खलील दोन विधाने पहा.

a) जमिनीवरुन जमिनीवर मार करणाऱ्या पृथ्वी-2 या आण्विक क्षेपणास्त्राची ओडिशामधील बालासोर-चंडीपूर लष्कराच्या तळावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.
b) साडेतीनशे किमीपर्यंत मारा करु शकणारे पृथ्वी हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.या क्षेपणास्त्राची 500 किलो अण्वस्त्र वा स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) उपराष्ट्रपती एम. हमीद अन्सारी यांनी "द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ एनर्जी ॲण्ड ग्रोथ" या पुस्तकाचे नुकतेच नवी दिल्ली येथे प्रकाशन केले.
b) हे पुस्तक दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांनी संपादित केलेले आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) योग्य पर्याय निवडा.

a) भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या पुंज यांत्रिकीतील एका गूढ सिद्धांताच्या आधारे अतिशय सुरक्षित इंटरनेट तयार करणे शक्य होणार आहे,असे स्वाइनबर्ग(ऑस्ट्रेलिया) येथील सेंटर फॉर क्वांटम अँड ऑप्टिकल सायन्सच्या सहायक प्राध्यापक मार्गारेट रीड यांनी सांगितले.
b) 'क्वांटम की'(Quantum key distribution) या तंत्राचा वापर करून संदेश कुठेही पकडला न जाता पाठवता येतो तो मधूनच कुणाला चोरता येत नाही.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) हवा प्रदूषणामुळे २०१२ या वर्षांत ७० लाख लोक मरण पावले, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
b) २०१२ मध्ये दर आठ जणांपकी एकाचा मृत्यू हा हवा प्रदूषणाने झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण व सार्वजनिक आरोग्य संचालक मारिया नेइरा यांनी म्हटले आहे.
c) आरोग्य संघटनेच्या मते आग्नेय आशियात भारत-इंडोनेशिया व पश्चिम पॅसिफिकमध्ये चीन, दक्षिण कोरिया व जपान, फिलिपिन्स या देशांना हवा प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त c)

MPSC लोकसभा निवडणूक -प्रश्नमंजुषा (४२)

६) खलील दोन विधाने पहा.

a) महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर नांदोसमध्ये (जिल्हा सिंधुदुर्ग) खास नवी 'फिल्म सिटी' उभारण्यात येत आहे.
b) या प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबर 'साई बॉलिवूड फिल्मसिटी इंडिया प्रा. लि.' कंपनी काम करणार आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) हिऱ्याच्या वायरमधून माहिती वाहून नेता येते असे दिसून आले असून या गुणधर्माचा वापर हिऱ्याचा वापर असलेले संगणक तयार करण्यासाठी होऊ शकतो.
b) पारंपरिक वायरमधून जसे इलेक्ट्रॉन वाहून नेले जातात तसे हिऱ्याच्या वायरमध्ये होत नाही, त्यात इलेक्ट्रॉन जागेवरच राहतात व त्यांचा जो स्पिन म्हणजे फिरणे असते त्यामुळे निर्माण होणारा चुंबकीय परिणाम एकमेकांकडे पाठवला जातो.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) संकेतस्थळांच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या अनुचित व्यापारासंबंधी सुरू असलेल्या चौकशीत योग्य ती माहिती देण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारतीय स्पर्धा नियमन आयोगाने गुगल या प्रसिद्ध कंपनीला एक कोटीचा दंड ठोठावला आहे.
b) 'मॅट्रीमोनी डॉट कॉम' आणि 'कन्झ्युमर युनिटी अॅण्ड ट्रस्ट सोसायटी' यांनी गुगलविरोधात तक्रार केली होती.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथाचे प्रकाशन येत्या १ मे रोजी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये करण्यात येणार आहे.
b) येथील पार्लमेंटमधील 'विन्स्टन चर्चिल सभागृहात' हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.
c) विशेष म्हणजे या ग्रंथात काढण्यात आलेली शिवरायांची सर्वच्या सर्व म्हणजे १०० चित्रे ही पालघरमधील ब्रिजेश मोगरे या वनवासी चित्रकाराने काढली आहेत.

  A. फक्त a) बरोबर
  B. विधान a) बरोबर b) नाही
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) जी-८ ची स्थापना १९७५ मध्ये झाली.
b) जी-८ हा आर्थिकदृष्टय़ा प्रगत देशांचा गट आहे.
c) प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश.

  A. a),b),c)
  B. b)आणि c)
  C. a) आणि b)
  D. एकही असत्य नाही


Mpsc Current Affairs March- प्रश्नमंजुषा (४०)


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.