महत्वाच्या पोस्ट

Current Affairs March- प्रश्नमंजुषा (३९)

Mpsc Current Affairs March

Mpsc Current Affairs- Multiple Choice Questions                                             

                          



१) हॅण्डरसन ब्रुक्स अहवालसंबंधी खालील विधाने पहा.

a) हॅण्डरसन ब्रुक्स अहवाल हा "१९६२ च्या भारत-चीन मतभेद" या विषयावर आहे.
b) हा अहवाल म्हणजे भारतासाठी अत्यंत संवेदनशील आणि चालू कृतीमूल्य जोपासणारे अति महत्वाचे गोपनीय कागदपत्र असून अशा कागदपत्रांवर जाहिररित्या वक्तव्य करणे चुकीचे आहे. असे मत संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केले.
c) अहवालावर ऑस्ट्रेलियन पत्रकार नेव्हीले मॅक्सवेल यांनी India's China War या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीसाठी सतीश काळसेकर यांना नुकतेच यावर्षीच्या 'साहित्य अकादमी' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
b) 'वाचणार्याची रोजनिशी' या सतीश काळसेकर यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) देशातील शक्तिशाली समांतर सुपर कॉम्प्युटर 'आदित्य' आयआयटीएम अर्थात इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे कार्यान्वित करण्यात आला.
b) या प्रणालीला '500 मोस्ट पॉवरफुल इन द वर्ल्ड आणि 500 ग्रीन इन द वर्ल्ड' ही दोन प्रमाणपत्र प्रदान केली गेली आहेत.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) योग्य पर्याय निवडा.

a) "आंबेडकर अवेकनिंग इंडियाज सोशल कनसायन्स" या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती एम. हमीद अन्सारी यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आले.
b) नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) निवडणूक खर्चाच्या मर्यादेसंबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) संसदीय मतदार संघासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये करण्यात आली आहे.
b) अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये मात्र ही मर्यादा ५४ लाख रुपये आहे.
c) विधानसभा मतदार संघांबाबतीत कमाल मर्यादा २८ लाख रुपये करण्यात आली आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त d)

MPSC मार्च प्रश्नमंजुषा(३८) चालू घडामोडी

६) खलील दोन विधाने पहा.

a) वोटर-वेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) या पध्दतीद्वारे मतदारांना मतदान यादी, मत पध्दतीचा उपयोग करून त्वरित फिडबॅक मिळविण्याची तरतूद आहे.
b) नागालँडमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये ‘व्हीव्हीपीएटी’चा समावेश सर्वप्रथम केला होता

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) पश्चिम घाटाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याने या भागाचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने निसर्गशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ समिती गठीत केली होती.
b) त्या नंतर गाडगीळ समितीचे निष्कर्ष तपासण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांचा उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला होता.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) बंगालच्या खाडी किना-यालगतच्या देशांची संघटना ' बिमस्टेक ' ( द बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) ची तिसरी परिषद नुकतीच म्यानमार येथे पार पडली.
b) भारतासह बांगलादेश , भूतान , म्यानमार , नेपाळ , श्रीलंका , आणि थायलंड या देशांनी एकत्र येऊन १९९७ साली बिमस्टेक संघटनेची स्थापना केली होती.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) २००९च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात सरासरी ५८.२ टक्के मतदान झाले.
b) नागालँडमध्ये सर्वाधिक ९० टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी ३९.७ मतदान झाले.
  A. फक्त a) बरोबर
  B. a), आणी b) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या व बहुजैववैविध्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटास आता केंद्र सरकारने 'पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील' घोषित केले आहे.
b) गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या सहा राज्यांमधील एकूण 56,825 चौरस किमी भाग हा संवेदनशील म्हणून घोषित केला आहे.
c) यामुळे या सर्व भागामध्ये खाणकाम, अणुउर्जा प्रकल्प आणि पर्यावरण खात्याच्या 'रेड' यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उद्योगांना बंदी असेल.
d) या संवेदनशील भागामध्ये महाराष्ट्रातील 17,340 चौरस किमी भूभाग असेल.

  A. a),b),c)
  B. b),c),d)
  C. b) आणि d)
  D. एकही असत्य नाही


अणुविज्ञान- प्रश्नमंजुषा (३७)


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.